onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -20-08–2026 एकुण कांदा गोणी -87,626
गावरान कांदा बाजार भाव
1 नंबर= 3900 ते 4500
2.नंबर= 2800 ते 3900
3 नंबर= 1800 ते 2800
4 नंबर= 1000 ते 2800
————————————————————————————————————————————————–
दारूच्या नशेत तरुणाचा वाहनांवर डोके आपटून राडा
दोन गाड्यांच्या काचा फोडल्या, तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल
अहिल्यानगर -दारूच्या नशेत एका तरुणाने स्वतःचे डोके वाहनांवर आपटून दोन चारचाकी गाड्यांच्या समोरील काचा फोडल्याची विचित्र घटना अहिल्यानगर शहरातील लालटाकी परिसरातील मिझगर कॉलनीत घडली. या घटनेत वाहनांचे नुकसान करण्यासह तो स्वतःही जखमी झाला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिझगर कॉलनी येथील रहिवासी परवेज युनूस शेख (वय ३३) यांचे ग्राहक सेवा केंद्र आहे. शेख यांची मारुती ८०० गाडी (क्रमांक एमएच १६ आर २२१९) आणि त्यांचे मित्र शाहरुख फकीर शेख यांची होंडा सिटी गाडी (क्रमांक एमएच १२ एलपी ७९५०) ही मिझगर कॉलनीमधील एस एस डेंटिंग पेंटिंग दुकानासमोर पार्क केलेली होती.दिनांक १८ ऑगस्टच्या रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास, सिद्धार्थनगर येथील रहिवासी दीपक भागवत वैरागर (वय २७) हा दारूच्या नशेत त्या ठिकाणी आला. त्याने अचानक या दोन्ही गाड्यांच्या समोरील काचांवर स्वतःचे डोके जोराने आदळण्यास सुरुवात केली.यात दोन्ही गाड्यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले, तर दीपक वैरागर हा स्वतःच्या डोयाला दुखापत करून घेत जखमी झाला. घटनेनंतर जखमी तरुणाला उपचारासाठी अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परवेज युनूस शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांनी दीपक भागवत वैरागर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक दळवी करत आहेत.


