तुकाराम मुंढे यांच्या राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल;तुकाराम मुंढें म्हणाले..

आयएएस तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून भेसळयुक्त आणि नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक असलेले खाद्यपदार्थ, उत्पादने आणि हॉटेल्सवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. जवळपास प्रत्येक दिवशी एफडीएच्या पथकांकडून राज्यातील कुठल्या ना कुठल्या भागात संबंधित आस्थापानांवर कारवाई करुन भेसळयुक्त माल पकडला जात आहे किंवा हॉटेल, डेअरी, दुकानात अस्वच्छता असल्याच्या कारणावरुन संबंधित आस्थापनांचे परवाने निलंबित केले जात आहेत. याचदरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या बदलीवरुन एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्रातून राजस्थानमधील सीकर येथे बदली झाल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये ही तुकाराम मुंढे यांची 26वी बदली असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यात काहीही तथ्य नसल्याचे स्वतः तुकाराम मुंढे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले आहे. माझा राजस्थानशी काय संबंध?, माझी बदली राजस्थानमध्ये कशी होईल? मी महाराष्ट्र कॅडरचा अधिकारी असल्याने आपली बदली महाराष्ट्रातच होऊ शकते, असं तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलं

गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन खात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चर्चेत आले होते. लाचखोरी आणि इतर भ्रष्ट कामांमुळे चर्चेत असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात आता आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आहे. तसा आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला होता. त्यानुसार 25 मे रोजी तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles