छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या, वाचवताना आई-वडील दोघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील तिसगावजवळील खवड्या डोंगरावरून एका तरुणाने उडी घेतली, त्याला वाचवताना वडिलांचाही तोल गेला आणि त्यांना डोंगरावरून कोसळताना पाहून आईने पाठोपाठ उडी घेतली. तिघेही उंच कड्यावरून खोल खाणीमध्ये पडले. खडकावर आदळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास घडली.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्जत पिंपळगाव मधील कुणाल मुरलीधर चांदगुडे (वय १९) या तरुणाने आधी उडी मारली नंतर त्याला वाचविण्यासाठी वडील मुरलीधर दामोधर चांदगुडे (वय ४८) पुढे आले. त्यांचा तोल गेला असे लक्षात येताच आईनेही उडी मारली. यात संगिता मुरलीधर चांदगुडे यांचा मृत्यू झाला. हे सर्व जण शहरातील झाल्टा फाटा परिसरातील अक्षयबन सोसायटीसमोर राहत होते. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, की आत्‍महत्‍या करण्यासाठी आलेला कुणाल सकाळी १० पासूनच खवड्या डोंगराच्या धोकादायक कड्यावर उभा होता. संगिता या उंच कड्यावरून त्याला हात जोडून मागे फिरण्याची विनंती करत होत्या, तर वडील मुरलीधर खालच्या कड्यावर उभे राहून त्याला समजावत होते. मात्र, कुणाल ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. सुमारे ३ तास त्याला समजावण्याचे प्रयत्न सुरू होते. या बाबत वाळूज एमआयडीसी पोलीस आणि महापालिका अग्निशामक दलालाही नागरिकांनी कळवले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशामक दलाच्या जवानांनी कुणालला वाचवण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी सुरक्षेची मोठी जाळी पकडून ठेवली. मात्र तो सातत्याने दिशा बदलत होता. त्यामुळे तो जाळीवर पडेलच याची शाश्वती नव्हती. त्यामुळे मुरलीधर हे त्याच्या दिशेने त्याला विनवण्या करत कड्यावर गेले, त्याचवेळी कुणालने डोंगरावरून उडी घेतली.

https://x.com/AMIT_GUJJU/status/2090735863407984944?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2090735863407984944%7Ctwgr%5Eac7740f11e13595fb3bd5a63932c1172ae3abf45%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Faurangabad%2Fkhavdya-dongar-son-father-mother-suicide-chhatrapati-sambhajinagar-family-suicide-karodi-waluj-css-98-6091057%2F

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles