onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक -22-08–2026 एकुण कांदा गोणी -89,077
गावरान कांदा बाजार भाव

1 नंबर= 3700 ते 4300
2.नंबर= 2500 ते 39700
3 नंबर= 1500 ते 2500

4 नंबर= 700 ते 1500

————————————————————————————————————————————————–

अकोलेतील कुंभेफळ येथे बिबट्याचा चिमुकल्यावर हल्ला

अकोले-तालुक्यातील कुंभेफळ येथे घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय अंकुर प्रशांत कोटकर याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि.२१) दुपारी ३ वाजता घडली आहे. आई, आजी, आजोबा आणि शेतातील कामगारांनी प्रसंगावधान राखत बालकाची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली.

जखमी अंकुरला प्रथम सुगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बनरक्षक पोपट कोटकर, बबन झोळेकर घटनास्थळी पोहचले, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील यांनी रुग्णालयात धाव घेत बालकाची विचारपूस केली. या घटनेने कुंभेफळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने परिसराची पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

कुंभेफळ परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा धोक्याची घंटा ठरला आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात याच परिसरात तीनवर्षीय श्रीशा वैभव शिंदे या बालिकेवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यावेळीही नागरिकांनी आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला आणि मोठा अनर्थ टळला होता. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी दिलीप कोटकर, सुनील कोटकर, संजय कोटकर, नामदेव कोटकर, यशवंत पांडे, शंकर पांडे, संपत कोटकर आदी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान शनिवारी घटनास्थळी पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles