धारदार हत्यारे घेऊन दहशत करणारे दोघे एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद ; दोन अल्पवयीन मुले ताब्यात

अहिल्यानगर-हातात धारदार कोयता, कत्ती आणि चाकू घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्‍या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत धारदार हत्यारे आणि दोन दुचाकी असा सुमारे एक लाख 20 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या आदेशानुसार तपास पथकातील कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार देविदास खेडकर यांना माहिती मिळाली की, अहिल्यानगर-मनमाड रोडवरील साईदिप हॉटेलच्या मागील बाजूस चार जण दुचाकीवरून धारदार हत्यारे घेऊन फिरत असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहेत. ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी धाव घेतली. पोलिसांना पाहताच संशयितांमध्ये हालचाल सुरू झाली. मात्र, तपास पथकाने त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांची नावे संस्कार प्रकाश येवलेकर (वय 22, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर, अहिल्यानगर) आणि ईश्वर गणेश नवसुपे (वय 22, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर, अहिल्यानगर) अशी निष्पन्न झाली. त्यांच्यासोबत दोन अल्पवयीन मुले असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर दोन पंचांच्या उपस्थितीत संशयितांची अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्यांच्या ताब्यातून धारदार कोयता, धारदार कत्ती, धारदार चाकू तसेच दोन दुचाकी असा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी पंचनामा करून सर्व मुद्देमाल जागेवरच जप्त केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक निरीक्षक थोरात यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार राकेश खेडकर, शैलेश रोहोकले, बापुसाहेब फोलाणे, देविदास खेडकर, राजू सुद्रीक, दीपक कुंदे, नवनाथ दहिफळे, किशोर जाधव, संपत खेडकर यांच्या पथकाने केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles