मनोज जरांगे पाटील याला अंतरवाली सराटीत आणि मुंबईत आंदोलन करून देऊ नका असे मत अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केले. न्यायमूर्ती उच्च न्यायालय न्यायाधीश घुगे यांच्या निर्देशाचे पालन करा असं मी पोलिसांना सांगितल्याचे सदावर्ते म्हणाले. या सगळ्या प्रकरणात राजकीय व्यक्ती देखील सक्रिय आहेत. माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासहित मराठा समाजातील इतर नेते यामध्ये सक्रिय आहेत. या आंदोलनाला सत्तेतील आणि सत्यबाहेरील थेट मराठा समाजाचा पाठिंबा असल्याचे सदावर्ते म्हणाले. त्यामुळं जातीय आकसापोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जातं आहे. मनोज जरांगे हा एक प्यादा आहे, तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सेवक असल्याचे सदावर्ते म्हणाले. मुख्यमंत्र्याचं घर टार्गेट करतो असं म्हटलं तरी एकनाथ शिंदे मूग गिळून बसल्याचे सदावर्ते म्हणाले. फक्त एकनाथ शिंदे नाहीतर सत्तेतील इतर मंत्री विखे पाटील देखील मूळ मूळ बोलतात. विखे पाटलांनी कधीच मनोज जरांगे पाटील यांचा निषेध केला नाही असेही सदावर्ते म्हणाले. मराठा भावांना मराठा आरक्षण नको तर ई डब्ल्यू एस आरक्षण हवे असे मला अनेक कॉल्स येत आहेत. पाटील नावाची पदे संविधानामध्ये मला दिसत नाहीत. गावामध्ये पाटील असतो तो बौद्ध किंवा आदिवासी समाजाचा असू शकतो. मनोज जरांगे म्हणतो की मला पाटील म्हणा. मनोज जारंगे पाटील गाड्यामधून येतो त्यामुळे हे आंदोलन टार्गेटेड आहे असे सदावर्ते म्हणाले.
मनोज जरांगे आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला डिस्टर्ब करण्याची भाषा करत आहे. रेल्वेची पटरी उघडून टाकू, विमानतळ उकडून टाकू असे बरळत आहे. महत्त्वाच्या व्यक्तींच्या घरांना टार्गेट करु हे अतिरेकी भाषा असल्याची टीका सदावर्ते यांनी केली. हा कोणाचातरी राजकीय प्यादा आहे. हे सगळं करणं असंविधानिक आहे. संविधानानुसार आंदोलन करण्याची मुभा आहे पण काही रिस्टिक्शन आहेत असेही ते म्हणाले. गंगाधर काळकुटे यांनी आझाद मैदान पोलिसांना अर्ज दिलेला आहे. ते म्हणजे मुंबईला धमकी पत्र आहे. या पत्राला गांभीर्याने घेतलं पाहिजे असं पोलिसांना मी सांगितल्याचे सदावर्ते म्हणाले. आंदोलन विशिष्ट राजकीय कारणासाठी होत आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बिगर मराठा समाजामधील आहेत असेही ते म्हणाले.


