अहिल्यानगरमध्ये फॉर्च्युनर कार व्यवहार,शिवसेना नेत्याच्या बंधूंवर फसवणुकीचा आरोप

कर्जतच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी घुले यांचे पती आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे स्थानिक नेते प्रवीण घुले यांचे बंधू सचिन विठ्ठलराव घुले यांच्याविरुद्ध 34 लाख 50 हजार रुपयांच्या फॉर्च्युनर कार व्यवहारात फसवणूक केल्याच्या आरोपावरून अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणामुळे कर्जतच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.कृष्ण दगडू शिंदे (वय 41, रा. विनायकनगर, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 316(2) अन्वये कारवाई केली आहे.फिर्यादीनुसार, 5 जुलै 2025 रोजी अहिल्यानगर शहरातील प्रेमदान चौक येथील राज मोटर्सच्या कार्यालयासमोर फॉर्च्युनर कार (MH 16-DM 8595) खरेदी-विक्रीचा व्यवहार ठरला. या कारची किंमत 34 लाख 50 हजार रुपये निश्चित करण्यात आली होती.

फिर्यादीचा आरोप आहे की, सचिन घुले यांनी विश्वास संपादन करून कार ताब्यात घेतली. त्यानंतर रोख रक्कम तसेच मध्यस्थांमार्फत एकूण 27 लाख 95 हजार रुपये देण्यात आले. मात्र, व्यवहारातील उर्वरित 6 लाख 55 हजार रुपये देण्यात आले नाहीत, असा आरोप फिर्यादीने केला आहे.

तसेच ताब्यात घेतलेली कारही परत न करता तिची परस्पर विल्हेवाट लावल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कृष्ण शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या तक्रारीनंतर तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस कॉन्स्टेबल भागवत बांगर या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, कर्जत नगरपंचायतीमधील सत्तांतराच्या राजकीय नाट्यात घुले बंधूंची भूमिका चर्चेत आली होती. त्यामुळे फॉर्च्युनर व्यवहारातील फसवणुकीच्या आरोपावरून दाखल झालेल्या या गुन्ह्याची राजकीय वर्तुळातही चर्चा होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles