प्रशासनात खळबळ ….फेरफार नोंदीत अनियमितता 3 तलाठी निलंबित

नाशिक- इगतपुरी तालुक्यात गावनिहाय महसूल फेरफार नोंदी हाताळताना झालेल्या अनियमिततेची गंभीर दखल घेत प्रांताधिकारी पवन दत्ता यांनी महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने एका मंडळ अधिकाऱ्यासह पाच ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर (तलाठी) शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून तालुक्यात याची जोरदार चर्चा सुरू आहे.इगतपुरी तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या दफ्तरांची तपासणी करण्यात आली. प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तपासणीदरम्यान मुकणे, वाडीवऱ्हे, मुंढेगाव, सांजेगाव आणि गोंदे दुमाला येथील महसूल कामकाजात विविध अनियमितता आढळून आल्या. फेरफार नोंदी करताना संबंधितांना आवश्यक नोटिसा न बजावता कार्यवाही पूर्ण करणे, अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन फेरफार नोंदी घेणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी न करणे, तसेच खातेदार आणि हितसंबंधित व्यक्तींना नोटीस न देता फेरफार नोंदीची प्रक्रिया पूर्ण करणे, अशा गंभीर त्रुटी तपासणीत निदर्शनास आल्या.

वाडीवऱ्हेचे मंडळ अधिकारी बबन कोकाटे यांच्या दफ्तर तपासणीत अधिनस्त तलाठ्यांच्या कामकाजावर आवश्यक नियंत्रण नसल्याचे आढळून आले. तसेच ई-ऑफिसद्वारे नामंजूर झालेल्या फेरफार नोंदींमध्ये संबंधित तलाठ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात कसूर झाल्याचेही तपासणीत समोर आले. या पार्श्वभूमीवर मंडळ अधिकारी बबन कोकाटे यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे

कारवाई झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे

बबन कोकाटे — मंडळ अधिकारी, वाडीवऱ्हे नितीन केदार — तलाठी, वाडीवऱ्हे सोमनाथ सांगळे — तलाठी, गोंदे दुमाला समीक्षा देव — तलाठी, सांजेगाव मनोज वाकदकर— तलाठी, मुंढेगाव पुष्कराज निकम— तलाठी, मुकणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles