महाराष्ट्रासह 15 राज्यांत वादळी पावसाचा इशारा,अहिल्यानगरसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट

सप्टेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी देशात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पुढील दोन दिवस वादळी वारे आणि मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे 17 सप्टेंबरपर्यंत देशातील बहुतेक भागांतून मान्सून माघार घेतो. यंदाही मान्सून ठरलेल्या वेळेतच परतणार असा सुरुवातीचा अंदाज होता; मात्र बदलत्या हवामानामुळे मान्सूनचा मुक्काम अधिक काळ लांबण्याचे स्पष्ट संकेत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही भागात मुसळधार पावसासह वीज पडण्याचा धोका व्यक्त करण्यात आला असून, मध्य प्रदेशसाठी अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे

गेल्या आठवड्यात देशातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली होती, तर काही ठिकाणी काही तास किंवा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. ही स्थिती आजपासून बदलण्याची शक्यता आहे. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी देशाच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 14 सप्टेंबरला पाऊस पुन्हा काही काळ विश्रांती घेईल आणि 15 सप्टेंबरपासून त्याचा जोर पुन्हा वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे

मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवली आहे. तर काही जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

११ सप्टेंबर रोजी नाशिक घाट, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

१२ सप्टेंबर रोजी धुळे, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस व विजांची शक्यता आहे.

१३ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा घाट, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

१४ सप्टेंबर रोजी नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यलो अलर्ट जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी विजांचा कडकडाट होईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles