केडगावमध्ये मित्रांच्या त्रासाला कंटाळून मुलाची आत्महत्या ; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

अहिल्यानगर-शहरातील केडगाव परिसरातील संभाजी चौक, वडारगल्लीत मित्रांच्या सततच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका अल्गपवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघा संशयित आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर धोत्रे (वय 22, रा. संभाजी चौक, वडार गल्ली, केडगाव, अहिल्यानगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. गणेश धोत्रे (वय 17) असे मयत मुलाचे नाव आहे. फिर्यादीनुसार, त्यांचा मयत भाऊ आणि आरोपी हे एकमेकांचे परिचित मित्र होते. मात्र, संशयित आरोपी शुभम घोडेकर आणि विराज गिरवले (रा. भूषणनगर, केडगाव, अहिल्यानगर) हे मयत मुलाला वारंवार मारहाण करून नाहक त्रास देत असत. घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजेच 8 सप्टेंबर 2026 रोजी देखील आरोपींनी मयत मुलाला शारीरिक व मानसिक त्रास दिला होता.

या सततच्या त्रासाला आणि अपमानाला कंटाळून मयताने 9 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास केडगावातील एका पडक्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. फिर्यादीच्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे हे करत आहेत

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles