राज्यात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

राज्यात पावसाने दडी मारली आहे. गेल्या तीस दिवसांपेक्षाही अधिक काळापासून महाराष्ट्रात पाऊसच झालेला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. एवढंच नाही तर पाऊस न झाल्यास जलसाठे देखील संकटात येण्याची शक्यता आहे. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दबाचा पट्टा विदर्भाकडून कोकणाकडे सरकरणार आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा नवा अंदाज समोर आला आहे. राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

‘शनिवारपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. विदर्भात 11 सप्टेंबरपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवस रविवार, सोमवार, मंगळवार 12 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या काळात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढील 24 तासांमध्ये विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. ज्यामध्ये चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यात आता हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे,’ असा हवामान अंदाज यावेळी पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.‘पुढील 24 तासांमध्ये विदर्भासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात देखील पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोला जिल्हा, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर कोकणात देखील पावसाचा अंदाज आहे. राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा विदर्भातून मराठवाड्याकडे आणि मराठवाड्याकडून उत्तर महाराष्ट्रात त्यानंतर कोकणाच्या दिशेनं सरकणार आहे. 13 आणि 14 सप्टेंबर रोजी नाशिक आणि मुंबई या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात बारा सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या काळात पावसाचा जोर राहणार आहे. या काळात राज्यातील वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल,’ असा अंदाज देखील हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles