Saturday, February 21, 2026

जामखेड तालुक्यात धुवाधार पाऊस जनजिवन विस्कळीत मोठ्या प्रमाणावर नुकासान सर्वत्र पाणीच – पाणी

*जामखेड तालुक्यात धुबाँधार पाऊस .*

*जनजिवन विस्कळीत मोठ्या प्रमाणावर* *नुकासान सर्वत्र पाणीच – पाणी*

*नुकसानग्रस्त कुटुंबांना मदतीपासून वंचित* *राहू देणार नाही* : *तहसीलदार गणेश माळी*

*जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )*

जामखेड – गेल्या पंधरा दिवसांपासून जमखेड तालुक्यात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. सोमवार व मंगळवारी तालुक्यात अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे गावोगावच्या ओडे नाले वाहत आहेत तालुक्यात २८० मिलीमिटर पावसाची नोंद झाली तर आज बुधवारी झालेल्या पावसामुळे जामखेड तालुक्यातील कुसडगांव येथे जोरदार पाऊस झाला त्यामुळे गावाला तळ्याचे स्वरूप आले आहे .

मे’च्या सरासरीपेक्षा सहापट जास्त पाऊस

जामखेड तालुक्यात मे महिन्याची सरासरी ३५.३ मिलिमीटर आहे. मे महिन्यात आतापर्यंत सरासरी तब्बल २८० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

दररोजच्या पावसाने शेतकरी वैतागला

सलग पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

२ सकाळ उजाडताच आभाळ दाटून येते, दुपारपर्यंत हलका किंवा मध्यम पाऊस, आणि रात्रीच्या वेळी अचानक मुसळधार पावसाची बरसात या पद्धतीच्या हवामानामुळे शेतकऱ्याचा शेतातला एकही दिवस समाधानाने जात नाही. परिणामी, बळीराजा अक्षरशः वैतागला आहे.

*आतापर्यंतचा*
*पाऊस (मिलिमीटर)*

जामखेड
२८० . ५
अरणगाव
२ ६८.२
खर्डा
३०६.७
नान्नज
२ ४६. २
नायगाव
२ ४१.४
पाटोदा
१०१.२
साकत
१६८.२

*भाजीपाला महागणार*

अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. टोमॅटो, भेंडी, मिरची, वांगी, कोथिंबीर यांसारख्या पिकांचे उत्पादन घटल्याने बाजारात पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काळात भाजीपाल्याच्या किमती वाढण्याचा अंदाज आहे. शेतकरी नुकसान भरपाईसाठी आणि वेळेत उत्पादनासाठी शासनाकडे मदतीची मागणी करत आहेत.

*वीज पडून चार जनावरांचा मृत्यू*

अवकाळी पावसात विजेचा जोर वाढल्याने चार शेतकऱ्यांच्या गायी जागीच मृत्युमुखी पडल्या. लोणी येथील परमेश्वर शेंडकर, जवळा येथील महादेव वाळुंजकर, मोहरी येथील राहुल भिसे आणि दिघोळ येथील सुदाम गिते यांच्या गायी मृत झाल्याची घटना घडली आहे. जनावरे ही शेतकऱ्यांची उपजीविकेची महत्त्वाची साधने असल्याने यामुळे कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
बाधित भागांना भेटी देणे सुरू केले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी तत्काळ पंचनामे करून मदतीची मागणी केली आहे. तालुक्यातील कृषी उत्पन्नावर आधारित अर्थव्यवस्थेला हा पाऊस मोठा झटका असून, शासनाने या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत व पुनर्वसन योजना जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

*घरांचे व दुकानांचे नुकसान..*

पावसामुळे अनेक घरांचे छप्पर उडाले, भिंती कोसळल्या आणि पावसाचे पाणी घरात शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. जामखेड येथील डी . आर . टेलर्स दुकानाचा स्लॅबचे कोसळले ;खर्डा येथील अश्रू मोरे, नान्नज येथील ज्ञानेश्वर फरतडे, चोंडी येथील अक्षय सोनवणे, शिऊर येथील तारामती पवार यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

*३० गावांना अवकाळीचा दणका*

तालुक्यातील ३० हून अधिक गावांमध्ये अवकाळी पावसाचा जबरदस्त दणका बसला आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या सरींनी शेतीचे मोठे नुकसान केले आहे.
कांदा, टोमॅटो, वांगी, कोथिंबीर यांसारख्या भाजीपाला पिकांसह डाळिंब, लिंबू, आंबा अशा फळपिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका खर्डा, जवळा, कुसडगांव ; नान्नज, बावी, हळगाव, शिऊर पिंपरखेड, फक्राबाद, मतेवाडी, राजुरी, लोणी, साकत, बांधखडक या गावांना बसला आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये झालेल्या पावसामुळे शेती, जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले असून, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी बाधित भागांना भेटी देत आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी अहवाल शासनाला सादर केला जाईल. कोणीही घाबरून जाऊ नये, प्रशासन आपल्यासोबत आहे. नुकसानग्रस्त कुटुंबांना मदतीपासून वंचित राहू दिले जाणार नाही अशी प्रतिक्रिया तहसीलदार गणेश माळी यांनी दिली .

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles