पाथर्डी तालुक्यात ट्रॅक्टरला धडकून दुचाकीने घेतला पेट, दोन तरुणांचा जागीच होरपळून दुर्दैवी मृत्यू

पाथर्डी -काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा अपघात अनेकदा आपण ऐकतो, पण अपघातानंतर अवघ्या काही क्षणांत दुचाकीने पेट घेऊन दोन जिवंत माणसांचा कोळसा व्हावा, अशी हृदयद्रावक घटना टाकळी मानूर परिसरामध्ये घडली आहे. ट्रॅक्टर-ट्रॉली आणि दुचाकीच्या या भीषण धडकेत दोन तरुणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला असून दोन हसतीखेळती कुटुंबे उध्वस्त झाली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर (अंबिकानगर) येथील रहिवासी असलेले इकबाल अत्तार (वय ३२) आणि शफिक शेख (वय ४०) हे दोघे मंगळवारी रात्री पाथर्डीहून आपल्या गावाकडे दुचाकीवरून निघाले होते. रात्री १० वाजेच्या सुमारास बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मानूर येथील दहिफळे वस्ती परिसरात, ‘समाधान हॉटेल’ समोर त्यांच्या दुचाकीची ट्रॅक्टर-ट्रॉलीशी अत्यंत जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, धडकेनंतर दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन गाडीने अचानक मोठा पेट घेतला.

मदतीसाठी धावले नागरिक, पण घात झाला!आगीच्या ज्वालांनी दोन्ही दुचाकीस्वारांना घेरले. रस्त्यावरून जाणाऱ्या व परिसरातील नागरिकांनी प्रचंड खळबळ उडाल्यानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचा शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, आगीचा वेग इतका थरकाप उडवणारा होता की, मदत मिळेपर्यंत दोन्ही तरुण गंभीररी्या भाजले गेले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

दोन कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगरया अपघातातील मृतांची कौटुंबिक पार्श्वभूमी ऐकून संपूर्ण परिसराचे डोळे पाणावले आहेत. मृत इकबाल याच्या कुटुंबावर गेल्या वर्षभरापासून संकटांची मालिका सुरू आहे. वर्षापूर्वी त्याच्या भावाचा अपघातात, तर सहा महिन्यांपूर्वी आईचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. आता कुटुंबाचा एकमेव कमावता आधार असलेला इकबालही काळाने हिरावून नेला. त्याच्या पश्चात वृद्ध वडील, पत्नी आणि एक लहान मुलगी आहे.

दुसरीकडे, मृत शफिक शेख हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडिलांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी अशा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तो एकटाच सांभाळत होता. या भीषण अपघातामुळे दोन्ही गावे आणि दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली असून रस्त्यांवरील असुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles