अहिल्यानगरमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर,: शहरातील बिशप लॉईड कॉलनीतील मकासरे लॅब समोर पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर लोखंडी पाईप आणि धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जय रवी खरात वय 27, व्यवसाय फायनान्स, रा. बिशप लॉईड कॉलनी हा तरुण घरात असताना मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी प्रवीण मधुकर सोनवणे याने जय खरात याला गाठले. आरोपीने लोखंडी पाईपने जय याला बेदम मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर दुखापत केली.

हा वाद सोडवण्यासाठी जखमी तरुणाची पत्नी मध्यस्थी करण्यासाठी आली असता, आरोपीने तिला शिवीगाळ केली. ‘तुम्हाला जिवंत मारून टाकीन’, अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. या झटापटीत आरोपीने फिर्यादीचा मोबाईल हिसकावून त्याचे नुकसान केले.

घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. जखमीला तातडीने अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. सी. भांबळ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली.

जखमी जय खरात याने दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांनी आरोपी प्रवीण सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार दीपक गांगर्डे आणि प्रवीण पांडागळे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles