आमिर खान तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर; गौरी स्प्रॅटसोबत बांधली लग्नगाठ,व्हिडीओ …

आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्न बंधनात

गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत नवीन संसाराला सुरुवात

आमिर खान आणि गौरी स्प्रॅटच्या लग्न सोहळ्यातील पहिला फोटो आला समोर

आमिर खान आणि गौरी स्प्रॅटने दोन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर लग्नगाठ बांधली. आमिर खानने मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी एक खाजगी समारंभ करून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. या लग्न सोहळ्याला त्यांचे जवळचे मित्र, कुटुंबीय आणि त्यांच्या आधीच्या लग्नांमधील मुले उपस्थित होती.आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात सर्व कुटुंब दिसत आहे. तसेच आमिर खान आणि गौरी स्प्रॅट एकत्र बसलेले दिसत आहेत. आमिर लग्नाच्या कागदपत्रांवर सही करताना दिसत आहेत. गौरीचा मुलगा दोघांच्या मध्ये उभा आहे. तसेच आमिरचा मुलगा देखील बाजूला उभा आहे. आमिर खान आणि गौरी स्प्रॅट दोघे एकत्र खूपच सुंदर आणि आनंदी दिसत आहेत.

आमिर खान आणि गौरी स्प्रॅटचा लग्नाचा फोटो प्रंचड व्हायरल होत आहे. यावर चाहते भरभरून कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. चाहते त्यांना नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आमिर आणि गौरी यांच्या नात्याची सुरुवात २०२४ मध्ये झाली. ते जवळपास वर्षभर लाँग-डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये आपल्या ६० व्या वाढदिवशी आमिरने माध्यमांना सांगितले की गौरी ही त्याची जोडीदार आहे.आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तासोबत 1986 मध्ये झाले असून त्यांचा घटस्फोट 2006 मध्ये झाला. त्यानंतर आमिर खानने चित्रपट निर्माती किरण रावसोबत लग्न केले. यांचा घटस्फोट 2021 मध्ये झाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles