पळवून आणलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका ; नगर तालुक्यातील दोन आरोपी ताब्यात

कोपरगावातून पळवून आणलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दरेवाडी येथून दोन आरोपी ताब्यात

अहिल्यानगर – कोपरगावातून पळवून आणलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची स्थानिक गुन्हे शाखेने सुटका केली असून, या प्रकरणी दोन आरोपींना दरेवाडी, हरीमळा परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

घटनेची हकीगत अशी –
दि. 18/08/2026 रोजी फिर्यादी निलेश भारत चावरे, रा. कोपरगाव यांची 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी अज्ञात इसमांनी पळवून नेल्याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 464/2026, बीएनएस कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील पिडीतेचा शोध घेण्याबाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, फुरकान शेख, अशोक लिपणे, आजिनाथ पाखरे, रणजीत जाधव, अमृत आढाव, अभिजीत आरकल, महिला पोलीस अंमलदार चिमा काळे व किरण ठुबे यांचे पथक तयार करून समांतर तपासाचे आदेश दिले.

तपास पथक शोध घेत असताना दि. 21/08/2026 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गुन्ह्यातील पिडीत मुलीस नूर राजू पठाण, रा. आंबेडकरनगर, राहता याने पळवून आणले असून ते हरीमळा, दरेवाडी, सोलापूर रोड येथे आहेत.

मिळालेल्या माहितीवरून पथकाने हरीमळा, दरेवाडी येथे जाऊन छापा टाकत पिडीत मुलगी आणि संशयित 1) नूर राजू पठाण, वय 19, रा. आंबेडकरनगर, राहाता यास ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपी व पिडीत मुलगी कोपरगाव येथून अहिल्यानगर येथे पळून आल्याचे आणि त्यांना पळून येण्यासाठी समीर मनोज सोनगत, वय 22, रा. हरीमळा, दरेवाडी याने मदत करून दोन दिवस स्वतःकडेच ठेवून घेतल्याची माहिती समोर आली. त्यामुळे 2) समीर मनोज सोनगत यासही ताब्यात घेण्यात आले आहे.

ताब्यातील दोन्ही आरोपींना पिडीत मुलीसह पुढील तपासकामी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles