अहिल्यानगर शहरात व परीसरात घातक शस्त्र व अग्नीशस्त्र बाळगणारा
सराईत गुन्हेगार एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द मा. जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांचे आदेश…
प्रस्तृत बातमीतील हकीगत अशी की, अहिल्यानगर शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील राहणारा बंटी उर्फ भावेश अशोक राऊत वय 32 वर्ष, याने कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत व परिसरात त्याचे साथीदारांसह दरोडा टाकणे, घरात घुसुन महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे, बलात्कार करणे, तसेच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणेे, शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण करणे, गावठी कट्टा वापरणे असे गंभीर स्वरुपाचे शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे एकुण 11 गुन्हे करुन तेथील राहणारे सर्व सामान्य लोकांवर दहशत निर्माण केलेली होती. त्यामुळे तोफखाना व कोतवाली पोलीस स्टेशन तसेच आजुबाजुच्या परिसरात सार्वजनीक सुव्यवस्थेस बाधीत झाली होती. सराईत गुन्हेगार बंटी उर्फ भावेश अशोक राऊत याचे समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रचलीत कायदयान्वये करण्यांत आलेल्या प्रतिबंधक व हद्दपारीच्या कारवाया अपुऱ्या व कुचकामी ठरत होत्या. त्याचे गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस निरीक्षक, श्री. प्रताप दराडे, कोतवाली पोलीस स्टेशन यांनी एम.पी.डी.ए. कायदयान्वये प्रस्ताव तयार करुन श्री. अमोल भारती, उप विभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे व श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्फत मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांना सादर केला होता.
सदर प्रस्तावाची मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी बारकाईने पडताळणी करुन सदरचा प्रस्ताव हा शिफारस अहवालासह मा.जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांना सादर केला होता.
नमुद प्रस्तावांची व सोबतच्या कागदपत्रांची मा. डॉ.श्री.पंकज आशिया, जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांनी पडताळणी करुन अहिल्यानगर जिल्हयातील सार्वजनीक सुव्यवस्था अबादित राहावी याकरीता सराईत गुन्हेगार बंटी उर्फ भावेश अशोक राऊत वय 32 वर्ष, रा. माणीक चौक, लाटे गल्ली, अहिल्यानगर स्थानबध्द करणे बाबतचे आदेश काढले असुन त्यास ताब्यात घेवुन नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द केले आहे.
सदर कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर, पोसई श्री. तुषार धाकराव, स.फौ. रविंद्र पांडे, पोहेकॉ सुरेश माळी, पोहेकॉ/ संदिप पवार, पोहेकॉ/शाहिद शेख, पोकॉ/ रविंद्र घुंगासे, पोकॉ/ विशाल तनपुरे, पोकॉ/ रमिझ आतार, सफौ/ महादेव भांड सर्व स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर व कोतवाली पोलीस स्टेशनचे मपोहेकॉ/शिल्पा कांबळे व पोकॉ/राहुल मासाळकर यांनी केली आहे.
अहिल्यानगर जिल्हयातील सराईत गुन्हेगार, वाळु तस्कर तसेच संघटीतपणे गुन्हे करणा-या टोळीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत असुन त्यांचेवर प्रचलित कायदयान्वये कठोर कारवाई करण्याचे संकेत मा.डॉ.श्री. पंकज आशिया, जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर व मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी दिलेले आहेत.


