अहिल्यानगर -कोतवाली पोलिसांनी समर्थनगर, बुरूडगाव रस्ता येथील एका खोलीवर छापा टाकून सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर कारवाई करत एकूण 30 लाख 50 हजार 350 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये रोख रक्कम, मोबाईल्स, चारचाकी व दुचाकी वाहने अशा विविध वस्तूंचा समावेश आहे.या कारवाईत 15 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मंगळवारी (8 जुलै) रात्री सातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार समर्थनगर, नक्षत्र लॉनजवळील लंकेश हर्षा याच्या खोलीत छापा टाकून जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. मंगेश तुकाराम चव्हाण, योगेश भाऊसाहेब बांडे (दोघे रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर), संदीप कारले (रा. केडगाव), आरिफ हुसेन पठाण (रा. सारसनगर), संदीप किसन हरेर (रा. फुलसुंदर मळा), परमेश्वर जयराम जंगम (रा. बुरूडगाव), सलमान बशीर शेख (रा. समर्थनगर), भाऊसाहेब रामभाऊ भोसले (रा. भोसले आखाडा), विनोद कैलास निस्ताने (रा. चर्च रस्ता, परदेशी गल्ली), भूषण बाबासाहेब बोरूडे (रा. बोरूडे मळा), सुदर्शन गोरख सुपेकर (रा. भोसले आखाडा), अश्विन आप्पा दिवटे (रा. भोसले आखाडा), ज्ञानेश्वर अरूण बिचारे (रा. कर्जुले हरीया, ता. पारनेर), विश्वजीत उत्तम थोरात, अक्षय युवराज रजपूत (दोघे रा. आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सेदवाड, अंमलदार बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी, सलीम शेख, विनोद बोरगे, विक्रम वाघमारे, सत्यजीत शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, सोमनाथ केकाण, महेश पवार, शिरीष तरटे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, प्रतिभा नागरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


