शेवगावात अवैध गुटखा विक्रीवर कारवाई; 56,912 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त

शेवगावात अवैध गुटखा विक्रीवर कारवाई; 56,912 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त

मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्याचे समूळ उच्चाटन करणे बाबत आदेश दिलेले आहेत.

वरील आदेशान्वये पोनि/श्री. संतोष मुटकुळे यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार बाळासाहेब खेडकर, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, किशोर शिरसाठ, महिला पोलीस अंमलदार किरण ठुबे यांचे पथक तयार करून अवैध गुटखा विक्री व वाहतूक करणारे इसमांविरुद्ध कारवाई करणेकामी रवाना केले.

दिनांक 02/07/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करून अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत शेवगाव ते दादेगाव जाणारे रोडलगत एक इसम, रंजित रवी ढहाळे, याचे राहते घराचे शेजारील खोलीमध्ये प्रतिबंधित आणि शरीरास अपायकारक होईल असा गुटखा व सुगंधीत तंबाखू विक्री करणे करीता ठेवले असल्याची माहिती प्राप्त झाली.

पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी रंजित ढहाळे यांचे घराजवळ जाऊन खात्री करता शेजारील घरा समोर एक इसम उभा असलेला दिसून आला. तेव्हा पथकाने सदर छापा टाकून एक इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नांव गाव विचारता त्याने त्याचे नांव संतोष एकनाथ जाधव, वय-46 वर्षे, रा. भगतसिंग चौक, शेवगाव ता. शेवगाव, असे असल्याचे सांगितले.

आरोपीचे कब्जातून 56,912/- रु किमतीचा हिरा पान मसाला, रॉयल तंबाखू, प्रिमीयम रत्ना तंबाखू, सुगंधी तंबाखू, असा एकूण 56,912/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ताब्यातील आरोपीविरुद्ध पोकॉ/782 किशोर आबासाहेब शिरसाठ नेम. स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाणे गु.र.नं. 557/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275, 3(5), सह अन्न सुरक्षा मानके 2006 चे कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेवगाव पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles