ई-केवायसी पडताळणीत बोगस लाभार्थी उघड; अपात्र महिलांकडून ११ कोटींची वसुली सुरू

लाडकी बहिण योजनेसाठी तारेवरची कसरत सुरु ठेवतानाच दुसरीकडे सरकारने अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली सुरु केली आहे. श्रीमंत आणि कर भरणाऱ्या महिलांनीही सरकारी तिजोरीवर डल्ला मारला असल्यानं आता या अपात्र बहिणींकडून 50 टक्के वसुली करण्यात आली आहे. डिसेंबर-2025 मधील ई-केवायसी आणि अर्ज पडताळणीतून या बोगस लाडक्या बहिणीं लाभार्थ्यांचा भांडाफोड झालाय. 12 हजार 915 अपात्र महिला लाभार्थी होत्या. त्यातील 6 हजार 457 लाडक्या बहिणींकडून आतापर्यंत 11 कोटी रुपये वसूल करण्यात आलेत. धक्कादायक बाब म्हणजे 2,652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीही अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेतला आहे. या कर्मचाऱ्यांनी 3 कोटी 58 लाख रुपये लाटल्याचे समोर आले आहे. हफ्त्यापोटी 18 ते 21 हजार रुपये मिळालेल्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पगारातून लाटलेली रक्कम वसुली केली जातेय. कारवाई म्हणून त्यांची एक वेतनवाढ रोखण्याचा निर्णयही प्रशासनानं घेतलाय.

एकीकडे प्रशासनाकडून बोगस महिला लाभार्थ्यांकडून वसुली सुरु आहे. मात्र योजनेत घुसखोरी करुन कोट्यवधी रुपयांची लुट केलेल्या पुरुष लाभार्थ्यांवर कारवाई कधी ?असा सवाल उपस्थित होतोय. महिला व बालकल्याण विभागाकडून त्याबाबत कुठलेही नियोजन सध्या दिसत नाहीये.

केवळ गरजू महिलांसाठी असलेल्या या योजनेत घुसखोरी करणाऱ्या पुरुषांवर पहिल्यांदा कडक कारवाई अपेक्षित होती. मात्र अपात्र महिलांकडून वसुली करणारं सरकार जावयांना मात्र सुट देतय का ? असा सवाल उपस्थित होतोय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles