Ahilyanagar ….इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून तरुणीची बदनामी

अहिल्यानगर-सोशल मीडियाचा गैरवापर करून तरुणीची बदनामी करणाऱ्या आणि लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या एका विकृताविरुद्ध अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून या तरुणीला सातत्याने अलील आणि त्रासदायक संदेश पाठवले होते.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 26 वषय तरुणी कोळगाव परिसरातील रहिवासी असून ती अंतर्गत सजावटकार म्हणून काम करते. आरोपी मोबाईल क्रमांक धारकाने पीडितेच्या नावाने इन्स्टाग्राम सोशल मीडिया संकेतस्थळावर वेगवेगळी बनावट खाती उघडली. यामध्ये त्याने तरुणीची बदनामी करण्याच्या उद्देशाने बनावट ओळख तयार केली. या बनावट खात्यांच्या माध्यमातून आरोपीने पीडित तरुणीच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर अलील, लज्जा उत्पन्न होईल असे संदेश पाठवले. हा प्रकार एप्रिल महिन्यामध्ये नऊ ते दहा दिवसांच्या कालावधीत सातत्याने सुरू होता. या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांक धारक आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अंमलदार सविता खताळ करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles