अहिल्यानगरमध्ये महावितरणचा सहायक अभियंता व वायरमन एसीबीच्या जाळ्यात

अहिल्यानगर -महावितरण कार्यालयाच्या नेवासा उपकेंद्रातील सहायक अभियंत्यासह, वीजजोड कामगाराला १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून सहायक अभियंता किरण गजेंद्र मोरे आणि वायरमन शिवकुमार नारायण आचारी दोघे ( रा. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे त्यांची नावे आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १) रोजी करण्यात आली.

याबाबत एका ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली हाेती. तक्रारदाराचा अॅक्वा, पाण्याचा प्लनट आहे. त्यांच्याकडे प्लनटसाठी स्वतंत्र वीजमीटर तसेच घरगुती व्यावसायिक असेआहेत. दि.२२ डिसेंबर २०२५ रोजी आरोपी मोरे व आचारी यांनी मीटर तपासणी करून विज चोरीचा आरोप केला व सुमारे चार लाख रुपयांचा दंड तसेच ३६ हजार रुपयांचे थकीत बिल भरण्याची धमकी दिली. त्यानंतर दि.२५ डिसेंबर २०२५ रोजी दोघे पुन्हा तक्रारदाराच्या घरी आले. चार लाखांचा दंड होण्याऐवजी दोन लाख रुपये द्या, आम्ही विज चोरीची कारवाई करणार नाही, अशी थेट लाचेची मागणी करण्यात आली.

याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने दि.३१ डिसेंबर २०२५ रोजी पावन गणपती मंदिरासमोर, नेवासा फाटा येथे लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी सहायक अभियंता मोरे याने तडजोडीअंती १ लाख २५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास तयारी दर्शविली. अखेर दि.०१ जानेवारी २०२६ रोजी देवरे हॉस्पिटलजवळ, नेवासा फाटा येथे सापळा रचण्यात आला. मोरे यांच्या सांगण्यावरून वायरमन शिवकुमार आचारी याने लाचेचा पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने त्याला रंगेहात पकडले.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती छाया कडू देवरे (सापळा अधिकारी) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोकॉ. गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक व वैभव सुपेकर सहभागी होते. संपूर्ण कारवाईवर पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांचे पर्यवेक्षण होते. या प्रकरणावर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनिल दोरगे यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles