नगर शहरात सावेडीतील नंदनवन कॉलनीत घरफोडी ;सोन्या-चांदीचे दागिने चोरीला

अहिल्यानगर-शहरातील सावेडी भागातील पाईपलाईन रोडवरील नंदनवन कॉलनीत बंद घर फोडून चोरट्यांनी 80 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यामध्ये 30 हजार रुपयांची रोख रक्कम आणि 50 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी साहिल श्रीराम पवार हे आपल्या कुटुंबासह पुणे येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांचे घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉकर तोडून चोरट्यांनी 5 ग्रॅम व 7 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, 250 ग्रॅम वजनाचे चांदीचे बिस्कीट आणि 30 हजार रुपयांची रोकड असा एकूण 80 हजार रुपयांचा माल चोरून नेला.

शेजार्‍यांनी दरवाजा उघडा असल्याचे पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फिंगरप्रिंट तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करून तपास केला. याप्रकरणी साहिल पवार यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार गणेश साठे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सावेडी उपनगरातील वाढत्या घरफोडीच्या सत्रामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles