अहिल्यानगर हादरलं! मुलाने वडिलांवर चाकूने वार करत संपवलं

वडील मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात दत्तनगर परिसरात पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याची घटना घडलीआहे. धक्कादायक म्हणजे कौटुंबिक कारणातून ही हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशपाक बागवान असे आरोपी मुलाचे नाव असून मुसा हसन बागवान असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सदर घटना काल रात्री सुमारे साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडली. आरोपी आशपाक बागवान याने आपल्या वडिलांवर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात मुसा बागवान गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, वडील आणि मुलामध्ये काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर काल रात्री तीव्र भांडणात झाले आणि संतापाच्या भरात आशपाकने वडिलांवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसोबत फॉरेन्सिक पथकही दाखल झाले असून घटनास्थळाची तपासणी करण्यात आली. पुरावे गोळा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी आशपाक बागवान याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अधिक चौकशी केली जात आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात नेमके कारण काय होते? वादाची पार्श्वभूमी काय होती? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नातेसंबंधांतील तणाव किती टोकाला जाऊ शकतो, याचे हे धक्कादायक उदाहरण मानले जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles