अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट अपंग प्रमाणपत्राची तपासणी होणार! गटशिक्षणाधिकार्‍यांना आदेश

अहिल्यानगर -जिल्ह्यातील अंतर्गत बदली प्रक्रियेतून सुटका व्हावी अथवा सोय व्हावी यासाठी अपंगत्व प्रमाणपत्र, घटस्फोट, परित्यक्त बाबत बोगस कागदपत्रे रंगवणार्‍या प्राथमिक शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकार्यांना दिले आहेत. त्यानुसार, बदलीसाठी संवर्ग-1 मधून अर्ज केलेल्या व घटस्फोटीत, परित्यक्त प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांची पुन्हा चौकशी होणार आहे.शिक्षकांच्या जिल्ह्यातील अंतर्गत बदलीसाठी असलेल्या संवर्ग-1 व घटस्फोटीत, परित्यक्त सवलतीचा लाभ घेणार्‍या शिक्षकांच्या प्रमाणपत्राच्या चौकशीबाबत ग्रामविकास विभागाच्या आदेशानंतर आता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शिक्षणाधिकारी पाटील यांनी स्वतंत्र आदेश काढत जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना सांगितले आहे की, त्यांच्या तालुक्यात ज्या शिक्षकांच्या अपंगत्व प्रमाणपत्राबाबत साशंकता आहे, अशा सर्व शिक्षकांची जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्फत पुन्हा तपासणी करण्यात यावी. संबंधितांच्या अपंग प्रमाणपत्राची ऑनलाइन यूडी-आयडी प्रमाणपत्राची तपासणी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीमार्फत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यानुसार आता गटशिक्षणाधिकारी प्रत्येक तालुक्यात विशेष संवर्ग-1 मधून बदलीसाठी अर्ज करणार्या, तसेच घटस्फोटीत-परित्यक्त शिक्षकांच्या न्यायालयाने मंजूर केलेल्या घटस्फोटाच्या प्रमाणपत्राची प्रत, शिक्षिकेने ती पतीसोबत राहत नसल्याचे सादर केलेले स्वयंघोषणापत्र, त्यांच्या रहिवासी दाखले, आधार कार्ड, शिधापत्रिका आदीची पडताळणी करण्यासोबत त्या राहत असलेल्या ठिकाणी समक्ष भेटी देऊन पाहणी करणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या पोटात गोळा आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles