माजी मंत्री धनंजय मुंडे भावुक ,“खऱ्या अर्थाने आधार हरपला…”जगताप कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

मा.आ. स्व.अरुण काका जगताप यांच्या परिवाराला माजी मंत्री धनंजय मुंडे यांची सांत्वनपर भेट

“खऱ्या अर्थाने आधार हरपला…” – भावुक प्रतिक्रिया देत धनंजय मुंडे यांनी अर्पण केली श्रद्धांजली

अहिल्यानगर : विधान परिषदेचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखात कायम पाठीशी असलेले स्व. अरुणकाका जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांत्वनपर भेट घेतली. स्व. अरुण काका यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुंडे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. भेटीदरम्यान वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, उद्योजक राजेश भंडारी, सामाजिक कार्यकर्ते सत्यम गुंदेचा यांच्यासह अनेक स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
काकांचं आमच्यावर अपार प्रेम होतं – मुंडेंची भावना धनंजय मुंडे यांनी श्रद्धांजली व्यक्त करताना भावनिक होत सांगितले, अरुण काका हे आमच्यासाठी केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर ते एक आपुलकीने भरलेले, प्रेमळ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व होते. अनेक प्रसंगी त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि पाठबळाचा अनुभव आम्ही घेतला. त्यांच्या जाण्याने आम्ही एक आधारवड गमावला आहे. त्यांच्या आठवणी आणि शिकवण आमच्यासोबत सदैव राहील. या भेटीदरम्यान मुंडे यांनी खास करून आमदार संग्राम जगताप यांची आस्थेने विचारपूस केली. संपूर्ण कुटुंबाला धीर देताना, त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्याशी असलेली आत्मीयता अधोरेखित केली.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मोठी पोकळी, स्व.अरुण काका जगताप हे केवळ राजकारणापुरते सीमित नव्हते. जिल्ह्यातील विविध सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांच्या कार्यशैलीत दूरदृष्टी, शिस्त आणि माणसांशी जोडणारी आपुलकी होती. त्यामुळेच त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबीय नाही, तर पूर्ण जिल्हा एका कणखर नेतृत्वाला मुकला आहे, अशी भावना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles