अहिल्यानगर, 31 मे 2026: महाराष्ट्र विधान परिषद अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उद्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. राणीताई निलेश लंके हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी दिली आहे.
या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चुरस वाढली आहे. काँग्रेस पक्षाने आधीच दीप चव्हाण आणि करण ससाणे यांना उमेदवारी दिली असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षानेही राणीताई लंके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
राणीताई लंके या पारनेर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्या असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. पक्षाच्या वतीने उद्या शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचे संदीप वर्पे यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे मतदार असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.


