Ahilyanagar… मनपा निवडणुकीत युतीची सरशी, विरोधकांचा सुफडा साफ

अहिल्यानगर महानगरपालिकेचा निकाल जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- २७
भाजप- २५
शिवसेना (शिंदे)- १०
काँग्रेस- २
एमआयएम-२
शिवसेना ठाकरे- १
बसपा- १
राष्ट्रवादी (शरद पवार) ः ०
मनसे- ०
समाजवादी पार्टी-०
अपक्ष ः ०

प्रभाग क्रमांक 1 मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली कामगिरी करत उमेदवार सागर बोरुडे आणि संपत बारस्कर यांनी विजय मिळवला आहे. याच प्रभागात भाजपच्या दीपाली बारस्कर आणि शारदा ढवण यांनीही बाजी मारत विजय नोंदवला आहे. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात जागांची बरोबरी दिसून येते.

प्रभाग क्रमांक 13 मध्ये मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वर्चस्व सिद्ध केलं आहे. या प्रभागातील चारही जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. सुरेश बनसोडे, सुजाता पडोळे, अनिता शेटीया आणि अविनाश घुले यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्वच्छ विजय मिळवला असून हा प्रभाग पूर्णपणे राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला आहे.

प्रभाग क्रमांक 15 मध्ये त्रिकोणी लढतीत भाजप आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला आहे. भाजपच्या दत्ता गाडळकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या सुवर्णा जाधव यांचा पराभव केला आहे. तर भाजपचे सुजय मोहिते यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांना पराभूत केलं आहे. या प्रभागात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पौर्णिमा गव्हाळे आणि गीतांजली काळे यांनी विजय मिळवत पक्षाची ताकद वाढवली आहे.

प्रभाग क्रमांक 16 मध्येही भाजप आणि राष्ट्रवादीची सरशी पाहायला मिळाली. भाजपचे विजय पठारे यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ओंकार सातपुते यांचा पराभव केला. भाजपचे अमोल येवले यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन कोतकर यांना पराभूत केलं. तर राष्ट्रवादीच्या सुनीता कांबळे आणि वर्षा काकडे यांनी विजय मिळवत या प्रभागात पक्षाची उपस्थिती मजबूत केली आहे.

प्रभाग क्रमांक 17 मध्येही राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात जागा वाटून घेतल्याचं चित्र आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मयूर बांगरे आणि अश्विनी लोंढे यांनी विजय मिळवला असून भाजपच्या कमल कोतकर आणि मनोज कोतकर यांनीही यश संपादन केलं आहे.

दरम्यान, प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेला दिलासा देणारा निकाल लागला आहे. शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे आणि आसाराम कावरे यांनी विजय मिळवत या प्रभागात पक्षाची पकड कायम ठेवली आहे.


अहिल्यानगर शिवसेना ( शिंदे गटाचे विजई उमेदवार )
संजय शेडगे
रुपाली दातरंगे
वैशाली नळकांडे
नवनाथ कातोरे
गणेश कवडे
सुनीता गेनप्पा
मंगलताई लोखंडे
सुरेखा कदम
बाळासाहेब बोराटे
दत्तात्रय कावरे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles