onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक -04-05–2026 एकुण कांदा गोणी -46,678
लाल कांदा बाजार भाव

1 नंबर= 1100 ते 1350
2 नंबर= 700 ते 1100
3 नंबर= 400 ते 800

4 नंबर= 200 ते 400

————————————————————————————————————————————————–
काम करण्यास नकार दिल्याने मजुरावर धारदार शस्त्राने हल्ला; नगर-मनमाड हायवेवरील घटना
​अहिल्यानगर – नगर-मनमाड महामार्गावरील गजानन कॉलनी परिसरात एका मजुराने सोबत कामाला येण्यास नकार दिल्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

​याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी आदेश शशीकांत शिंदे (वय २४, रा. नवनागापूर) हा मजूर म्हणून काम करतो. १ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तो गजानन कॉलनीतील नगर-मनमाड हायवेवर असताना आरोपी सुमित शिंदे तेथे आला. आरोपीने आदेशला “तुला काम पाहिजे असेल तर माझ्यासोबत चल” असे सांगितले. मात्र, आदेशने त्याच्यासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. या साध्या कारणावरून आरोपीला प्रचंड राग आला.
​रागाच्या भरात आरोपीने स्वतःजवळील कोणत्या तरी धारदार शस्त्राने आदेशच्या कंबरेवर आणि उजव्या खांद्याखाली वार करून गंभीर दुखापत केली. इतकेच नव्हे तर, “जास्त माज केला तर तुला जिवे ठार मारून टाकीन,” अशी धमकी देत आरोपीने आदेशच्या दुचाकीचे (एमएच १६ डीए ९५३९) देखील नुकसान केले. जखमी आदेशवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी पोलीस नाईक पालवे अधिक तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles