onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -21-05–2026 एकुण कांदा गोणी -46,806
लाल कांदा बाजार भाव
1 नंबर= 1000 ते 1200
2.नंबर= 600 ते 1000
3 नंबर= 350 ते 600
4 नंबर= 150 ते 350
————————————————————————————————————————————————–
टेम्पो चोरणार्या आरोपीस कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले. जहीर सादीक शेख (वय १९, रा. नारायणडोह, ता. नगर) असे त्याचे नाव आहे.
पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाटील, बाळकृष्ण दौंड, विनोद बोरगे, राहुल शिंदे, साबीर शेख, विशाल दळवी, विजय ठोंबरे, दत्तात्रय कोतकर, सचिन लोळगे, शिरीष तरटे, अतुल काजळे, अमोल गाडे, दीपक रोहोकले, सूरज कदम, सत्यम शिंदे, रमेश शिंदे, अतुल लाटे, याकूब शेख, पल्लवी रोहोकले, राहुल गुंडू यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या टेम्पोचा शोध घेत असताना पोलिस सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करीत होते. आरोपी टेम्पोसह पुणे बसस्थानकासमोर येणार असल्याची त्यांना माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ पुणे बसस्थानक येथे जाऊन टेम्पोचा पाठलाग करून आरोपीस पकडले. त्याने त्याचे नाव जहीर सादीक शेख असे सांगितले.


