onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक -09-07–2026 एकुण कांदा गोणी -1,14,942
गावरान कांदा बाजार भाव

1 नंबर= 2200 ते 2800
2.नंबर= 1500 ते 2200
3 नंबर= 900 ते 1500

4 नंबर= 400 ते 900

————————————————————————————————————————————————–

नवीन आपले सरकार केंद्र आयडी प्रदान करण्यासाठी
१७ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

अहिल्यानगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रात नवीन आपले सरकार सेवा केंद्र आयडी प्रदान करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. परंतु ८८ ग्रामपंचायतींमध्ये एकही ऑनलाइन अर्ज प्राप्त झाला नाही. त्या ग्रामपंचायतींतील रिक्त जागांसाठी १७ जुलै, २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समितीचे सदस्य सचिव दादासाहेब गिते यांनी केले आहे.

या रिक्त जागांसाठी ८ जुलै ते १७ जुलै २०२६ या कालावधीत https://ahilyanagaraaplesarkar.com या संकेतस्थळावर पात्र व्यक्तींनी अर्ज सादर करावेत. अर्जासाठीच्या अटी व शर्ती पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसारच लागू राहतील.

रिक्त ग्रामपंचायतींमध्ये अहिल्यानगर तालुक्यात ४, अकोले ३३, जामखेड ६, कर्जत २, कोपरगाव ४, नेवासा २, पारनेर ७, पाथर्डी ६, राहुरी ५, संगमनेर १५, शेवगाव २, श्रीगोंदा १ तर श्रीरामपूर तालुक्यात २ अशा एकूण ८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. रिक्त ८८ ग्रामपंचायतींची नावे https://ahilyanagar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही कळविण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles