onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -26-07–2026 एकुण कांदा गोणी -80,850
गावरान कांदा बाजार भाव
1 नंबर= 2000 ते 2600
2.नंबर= 1300 ते 2000
3 नंबर= 700 ते 1300
4 नंबर= 400 ते 700
————————————————————————————————————————————————–
भरधाव स्विफ्ट कारची बुलेटला धडक; केडगाव येथील तरुण जखमी
अहिल्यानगर: अहिल्यानगर शहरात पुन्हा एकदा बेपर्वा वाहन चालविल्यामुळे भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. केडगाव येथील सैनिक कॉलनीच्या चौकात एका भरधाव स्विफ्ट कारने बुलेटला जोरदार धडक दिली. या अपघातात बुलेटस्वार तरुण जखमी झाला असून त्याच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदर्शनगर (केडगाव) येथील रहिवासी शुभम अशोक कुंदाडे (वय २२) हा तरुण आपल्या बुलेट मोटरसायकलवरून (क्रमांक MH 16 DA 7315) सक्कर चौकाकडून घराकडे जात होता. तो सैनिक कॉलनीच्या चौकात आला असता, उजव्या बाजूने आलेल्या एका ग्रे रंगाच्या स्विफ्ट कारने (क्रमांक MH 16 BH 8433) त्याला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की शुभम रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. त्यानंतरही कार चालकाने दुचाकी काही अंतरापर्यंत घासटत नेली. या अपघातात शुभमच्या दोन्ही पायांना मुका मार लागून तो जखमी झाला. स्थानिक तरुणांनी त्याला तात्काळ केडगाव येथील साई क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केले.
अपघात झाल्यानंतर स्विफ्ट कारचा अज्ञात चालक घटनास्थळावरून निघून गेला. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर शुभम कुंदाडे याने कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात स्विफ्ट कार चालकाविरुद्ध फिर्याद दिली. कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी हयगयीने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


