onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -07-09–2026 एकुण कांदा गोणी -75,854
गावरान कांदा बाजार भाव
1 नंबर= 4300 ते 5000
2.नंबर= 3000 ते 4300
3 नंबर= 2000 ते 3000
4 नंबर= 1000 ते 2000
————————————————————————————————————————————————–
मार्केटयार्ड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
अहिल्यानगर : शहरातील छत्रपती मार्केटयार्ड पुतळा परिसरातील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या तीन वाहनांच्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दरेवाडी येथील वाहनचालक मयुर बंडु कुल्लाळ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
मयुर बंडु कुल्लाळ हे आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो (क्रमांक एमएच 16 एवाय 0798) मार्केटयार्ड परिसरात पार्क करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते वाहनाजवळ आले असता, गाडीच्या चेसी ब्रॅकेटचे नट-बोल्ट उघडून त्यातील साडेचार हजार रुपये किमतीची केबीएच कंपनीची बॅटरी चोरीला गेल्याचे लक्षात आले. कमलेश बाळासाहेब दाणे (रा. नारायणडोहो) यांच्या टाटा 909 टेम्पोची (एमएच 04 ईबी 8830) साडेचार हजार रुपयांची एक्साईड कंपनीची बॅटरी आणि दिलीप भिमाजी पादीर (रा. वाकोडी) यांच्या टाटा 1109 टेम्पोची (एमएच 16 एई 4408) तीन हजार रुपयांची लाल रंगाची बॅटरीही चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.


