onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -12-09–2026 एकुण कांदा गोणी -43,502
गावरान कांदा बाजार भाव
1 नंबर= 4200 ते 4800
2.नंबर= 3900 ते 4200
3 नंबर= 1900 ते 2600
4 नंबर= 700 ते 1700
————————————————————————————————————————————————–
मोटारसायकलच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू, दोघे जखमी
मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू तर दोघेजण जखमी झाले.नगर-मनमाड राज्य महामार्गावरील राहुरी शहर हद्दीतील हॉटेल रुबाब समोर मध्य रात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची ही घटना घडली.
शहरातील अनिकेत तनपुरे हा तरुण आपल्या मित्रासमवेत रात्री 11.30 वाजे दरम्यान हॉटेलमध्ये जेवण करून एम.एच.17 डिके 4411 मोटरसायकलवर घरी परतत होता. त्याच वेळी अकोले येथील ऋषिकेश बाळासाहेब गिऱ्हे (वय 19 ) हा एम.एच.17 सी.डब्लू 6811 या मोटरसायकल वरून राहुरी फॅक्टरीकडून राहुरी दिशेने जात होता.हॉटेल रुबाब समोर दोन्ही मोटरसायकलची समोरासमोर जोराची धडक झाल्याने ऋषिकेश बाळासाहेब गिऱ्हे या तरुण जागीच ठार झाला.
तर गंभीर जखमी झालेल्या अनिकेत तनपुरे याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेतील जखमी शुभम तनपुरे व एका महिलेवर राहुरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या अपघातामुळे नगर-मनमाड महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते व पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे करीत आहे.


