पारनेरमध्ये सुजित पाटलांचा शिवसेनेत प्रवेश;आणि शहराचा श्वास मोकळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोरच एका मिनिटात…..

पारनेर शहराच्या विकास आराखड्याला गेले दीड–दोन वर्ष राजकारणाच्या गलिच्छ खेळानं ‘ग्रहण’ लागलं होतं. फाईल मंत्रालयात जात होती… येत होती… पुन्हा अडकत होती… आणि शहराची विकासकामं राजकीय ‘साठमारीत’ चिरडली जात होती.पण अखेर बुधवारी एकनाथ शिंदे यांच्या दालनात सुजित झावरे पाटील या नावाचं लेझर कटिंगचं शस्त्र उतरलं… आणि पारनेरचा डीपीआर मंजूर करून निघाला.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी राष्ट्रवादीला अलविदा करून शिंदेसेनेत प्रवेश केला आणि पारनेरमध्ये थरारक शक्तीप्रदर्शन केले.झावरे यांच्या प्रवेशाची राज्यात खळबळ झाली.एकनाथ शिंदेंही म्हणाले “इतक्या मोठ्या गर्दीने मला दंग केले!”याच वेळी झावरे पाटलांनी पारनेरच्या डीपीआरचा मुद्दा शिंदेंसमोर अगदी ‘डायरेक्ट’ टाकला.आणि तेव्हाच निर्णय झाला बुधवारी झावरे पाटलांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.शिंदेंनी लगेच नगरविकास सचिवांना बोलावलं. सचिव लगेच आले नाहीत…पण आश्चर्य म्हणजे उपमुख्यमंत्री स्वतः त्यांच्या दालनात तब्बल अर्धा तास वाट पाहत बसले! हा प्रसंग मंत्रालयात चर्चेचा विषय झाला. शेवटी सचिव आले…फाईल उघडली… आणि एकाच स्ट्रोकमध्ये मंजुरी.
पारनेरचा डीपीआर ‘क्लिअर’.फाईल ‘फास्ट ट्रॅक’वर. आणि शहराला नवा श्वास.
५ कोटींचा निधी खुला, गट क्र. ३२०६ आणि ३२०६ मध्ये बगीचा, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि फायर ब्रिगेड केंद्र यासाठी पूर्वी जागा ‘वर्ग’ होत नव्हत्या… आता थेट काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा ! आंबेडकर स्मारकासाठी १ कोटी १० लाख ‘अनफ्रीज’ खा. नीलेश लंके यांनी दिलेला निधी प्रत्यक्षात वापरासाठी खुला, बांधकामांच्या परवानग्या सुलभ, राष्ट्रीय कृत बँका, महामंडळांचे कर्ज सहज मिळणार
निवडणुकीपुरते राजकारण… नंतर समाजकारण!

झावरे पाटील म्हणाले, “वसंतदादा झावरे पाटलांनी दिलेला मंत्र मी विसरत नाही.पारनेरकरांच्या विकासासाठी कोणत्याही पक्षाच्या दारात जावं लागलं तरी हरकत नाही. पदाधिकाऱ्यांनी मागणी केली… शब्द दिला… आणि शब्द पाळला.”

डीपीआर मंजुरी ही फक्त फाईल नाही…ते पारनेर शहराच्या विकासाच्या दाराचं कुलूप आहे. आणि हे कुलूप उघडण्यासाठी सुजित झावरे पाटील – एकनाथ शिंदे या जोडीने असा धडाका केला की संपूर्ण शहर भारावून गेलं आहे. पारनेरकरांचा सूर आहे की ,“ग्रहण सुटलं, विकास उगवला

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles