महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 12 जून 2025 च्या आदेशानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 (कलम 158 उपकलम (1)(च)) अंतर्गत नगर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अधिसूचना जारी केली आहे.
अधिसूचनेनुसार, प्रारूप प्रभाग रचना दिनांक 14/07/2025 पासून लागू होणार असून, संबंधित क्षेत्रातील रहिवाशांनी सूचना अथवा हरकती असल्यास त्या 21/07/2025 पर्यंत लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात सादर कराव्यात. यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
PDF फाईल पाहण्यासाठी इथे क्लिक करा


