नगरमध्ये ॲकॅडमी चालकच निघाला नराधम, विद्यार्थीनीवर शारीरिक अत्याचार, गुन्हा दाखल

स्ट्रेचिंग करण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीशी जवळीक साधून, तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी येथील रनर्स अकॅडमीचा चालक जावेद शेख (हल्ली रा. जकातेनगर, श्रीगोंदे) याच्याविरुद्ध श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित विद्यार्थिनी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. ती नोव्हेंबर २०२४ पासून रनर्स अकॅडमीमध्ये सरावासाठी जात होती. एके दिवशी पीडितेने आपला पाय लचकल्याचे प्रशिक्षक जावेद शेख यास सांगितले. त्यावेळी त्याने तिला दुसऱ्या दिवशी पहाटे मैदानावर बोलविले. त्यावेळी स्ट्रेचिंग करण्याच्या बहाण्याने तो पीडितेला स्पर्श करू लागला.

तिने विरोध करूनही त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले. सदरबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

जानेवारी २०२५ मध्ये पीडितेचे पोट दुखू लागल्याने ती शहरातील ग्रामीण रुग्णालयात गेली. तिथे तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिने ही बाब जावेद शेख याला सांगितली. त्यावेळी आरोपीने त्याच्या एका साथीदारासह पीडितेच्या खोलीजवळ जाऊन तिला गोळ्या दिल्या. त्या गोळ्या खाल्ल्याने तिचा गर्भपात झाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles