Wednesday, October 29, 2025

अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट….

सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिक्षणावरून सध्या टिकेची झोड उठवत ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर त्याच्यावर अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भावनिक पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं. ‘वडिलांच्या निधनानंतर दादांनी शिक्षण अर्ध्यात सोडलं. त्यामुळे कोणीही अजितदादा यांच्यावर या मुद्द्यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नाही. ही त्यांच्या जीवनातील अतिशय संवेदनशील घटना आहे ‘असं म्हणत रूपाली चाकांकारांनी लिहल्यानंतर पुन्हा अंजली दमानिया यांनी कडक रिप्लाय दिला आहे. दमानिया यांनी रुपाली चाकणकरांच्या पोस्टला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावर पुन्हा रिपोस्ट केलेली अंजली दमानिया यांची पोस्ट चर्चेत आहे .

”आदरणीय अजित दादा पवार यांच्या वडिलांचे हृदय विकाराने दुःखद निधन झाले. त्या वेळी अजितदादा कोल्हापूर येथे शिक्षण घेत होते.वडिलांच्या निधनानंतर दादांनी शिक्षण अर्ध्यात सोडले.त्यामुळे कोणीही अजितदादा यांच्यावर या मुद्द्यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून ही त्यांच्या जीवनातील अतिशय संवेदनशील घटना आहे. शिक्षण सोडून बारामतीमध्ये आल्यावर दादांनी शेती करायला सुरूवात केली, पोल्ट्री व्यवसाय वाढवला, वेगवेगळी पिके घेतली. मग त्यांनी राजकारणाचा मार्ग निवडला. गणितात अतिशय हुशार आणि इमारती, रस्ते, पूल आदींच्या बद्दल इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास असणारे अजितदादा आहेत. त्यांचा दृष्टिकोन हा काळाच्या पुढे बघण्याचा कायम राहिलेला आहे. शिक्षण आणि कृषी क्षेत्रात एआय वापरण्यासाठी आग्रही असणारे अजितदादा पवार आहेत. त्यांना भविष्याचा अचूक वेध घेता येतो तो त्यांच्या अभ्यासू आणि चौकस दृष्टीकोनामुळेच..” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

https://x.com/anjali_damania/status/1977673042240172256?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1977673042240172256%7Ctwgr%5E35cedd99950d9d2f2b68963d02a4c874fa060667%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fpolitics%2Fanjali-damania-on-rupali-chakankar-post-on-ajit-pawar-education-study-level-political-news-1391768

या संदर्भात एक्स माध्यमावर पोस्ट केली. त्या म्हणाल्या, ‘ मग अजित पवारांनी कृषी मंत्री जरूर व्हावे. अर्थ मंत्रालय हा खूप महत्त्वाचा आणि अतिशय गंभीर विषय आहे. यातील सगळ्या बाबी समजण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास/ ज्ञान असणे आवश्यक आहे. ‘ त्यापुढे म्हणाल्या, ‘ स्विझर्लंड हा देश 41,285 चौ किमी आहे. आणि महाराष्ट्र 3,07 हजार 713 चौ.किमी आहे.म्हणजे आपले महाराष्ट्र राज्य हे स्वित्झर्लंड या देशाच्या तुलनेत 8 पट मोठे आहे . स्विझरलँड ची जीडीपी 83 लाख 33 हजार कोटी आहे .आणि महाराष्ट्राची 42 लाख 67 हजार कोटी आहे .म्हणजे अर्ध्याने .महाराष्ट्रावर कर्ज आता 9 लाख 32000 कोटी आहे .ते कसे कमी ?काही ब्ल्यू प्रिंट आहे का ?असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला .त्यावर अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भावनिक पोस्ट करत प्रत्युत्तर दिले आहे .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles