महाराष्ट्र विकास सेवेतील राजपत्रित अधिकारी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला
दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार
अहिल्यानगर-महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने अतिवृष्टी व पुरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा सामाजिक निर्णय घेतला आहे. संघटना आपल्या २ दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहे.
राज्यभरात अधिकारी आणि कर्मचारी यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचाच एक भाग व सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने त्यांच्या दोन दिवसांच्या वेतनाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्य निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी देखील या संकल्पनेला पाठींबा दर्शविलेला आहे.
संघटनेचे राज्याध्यक्ष वासुदेव सोळंके, सचिव तुकाराम भालके, कार्याध्यक्ष दादाभाऊ गुंजाळ आणि पदाधिकारी यांनी नुकतेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदानाबाबतचे निवेदन सादर केले. सध्या महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संवर्गात अपर आयुक्त, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी आणि प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कार्यरत आहेत. या सर्व अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी एक कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य ठेवले असून, अहिल्यानगरमध्ये देखील हे दोन दिवसांचे वेतन जमा करण्याची घोषणा केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राहुल शेळके व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठराव घेऊन दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनीदेखील मदतीचा हात पुढे केला आ


