अमेरिका आणि इराण यांच्यातील दुसरी बैठक अयशस्वी ठरल्यानंतर राष्ट्राध्यक्ष्य डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. वॉशिंग्टनच्या व्हाइट हाऊसजवळील हॉटेल हिल्टनमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारादम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स हॉटेलमध्ये पत्रकारांसोबत डिनर पार्टी करत होते. गोळीबारानंतर सीक्रेट सर्व्हिस एजेन्ट्सने ट्रम्प आणि वेन्स यांना सुरक्षितरित्या हॉटेलमधून व्हाइट हाऊसमध्ये नेलं.
वॉशिंग्टन डीसीच्या व्हाइट हाऊस पत्रकारांसोबत सुरू असलेल्या डिनरदरम्यान हल्ला झाला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांना सीक्रेट सर्व्हिसने तातडीने सुरुक्षित ठिकाणी नेलं. सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तर देत हल्लेखोराला तातडीने पकडलं. या गोळीबाराच्या घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक मानली जात आहे.
डिनर पार्टीममध्ये ट्रम्प यांच्यासोबत पत्नी मेलानिया आणि उपाराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स देखील होत्या. लोक डिनर पार्टीचा आनंद लुटत होते. गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर सीक्रेट सर्व्हिसने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना तातडीने घेरलं. या घटनेदरम्यान २६०० लोकांना घरात लपून जीव वाचवला. हॉटेलमधील वेटर पळून डायनिंग हॉलमध्ये लपले. पत्रकार देखील जीव वाचवण्यासाठी टेबलाच्या खाली लपले. सुरक्षा रक्षकांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
https://x.com/ANI/status/2048216207963357354?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2048216207963357354%7Ctwgr%5Ec8003a647c0a44bdce2dd05ff011d273c46f9de0%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fnational-international%2Fdonald-trump-safe-after-shooting-near-washington-hilton-secret-service-acts-fast-vvg94
अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी हॉटेल रिकामे करून सील केलं आहे. संशयित हल्लेखोरांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केलं आहे. हिल्टन हॉटेल आणि आसापासच्या ठिकाणी नाकेबंदी लावली आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. सध्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया आणि उपाराष्ट्राध्य वेन्स सुरक्षित आहेत. डोनाल्ड ट्रम्प स्वत: या घटनेकडे बारकाईने लक्ष देत आहेत. त्यांनी हल्लेखोरांविषयी माहिती आणि हल्ला करण्याचं कारण शोधण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणांना दिले आहेत.


