अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये आग, तीन बालकांचा मृत्यू

अमरावती: येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्देवी घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. आग लागल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. आगीवर लगेच नियंत्रण मिळवण्यात आले.सोमवारी पहाटेच्या सुमारास नवजात शिशू अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला. त्यानंतर आग लागली. ती झपाट्याने पसरली. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या कक्षातील इतर बालकांना सुरक्षितपणे हलवण्यास सुरूवात केली. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. या ठिकाणी एकूण तीन नवजात शिशू अतिदक्षता कक्ष आहे. या तीन कक्षांमध्ये एकूण प्रत्येकी १३ अशी मिळून ३९ नवजात बालकांवर उपचार करण्याची क्षमता आहे. त्यापैकी एका कक्षाला आग लागली. या कक्षात एकूण १२ बालके होती.

नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला आग लागल्याचे लक्षात येताच सेवेवर असलेल्या परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी धावपळ करून बाळांना बाहेर काढले, मात्र दुर्देवाने तीन बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. अवघ्या वर्षभरापुर्वी नवीन इमारतीत हा नवजात शिशू अतिदक्षत विभाग सुरू करण्यात आला होता. या ठिकाणी कमी दिवसांचे, कमी वजनाचे आणि गंभीर अवस्थेतील बालकांवर उपचार करण्यात येतात. मात्र, आग लागल्यानंतर रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा का कार्यान्वित झाली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील आपात्कालीन सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles