Anushka Sharma अभिनेत्रीच्या एका नव्या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा

Anushka Sharma अनुष्का शर्माने क्रिकेटर विराट कोहलीशी लग्न केल्यानंतर ती अभिनय क्षेत्रापासून दूर गेली. त्यामुळे अभिनेत्री आता मनोरंजनविश्वापासून दूर नवरा आणि मुलांबरोबर लंडनमध्ये राहत आहे.

अभिनेत्रीच्या एका नव्या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. अनेक दिवसांनंतर ती एका नवीन जाहिरातीमधून झळकत आहे.

अनुष्का बऱ्याच काळापासून स्क्रीनपासून दूर आहेत. मात्र आता ती एका ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीत दिसली आहे. तिने या जाहिरातीचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनुष्काच्या कमबॅकची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. त्यामुळे तिला पुन्हा स्क्रीनवर पाहून चाहते खूप आनंदी झाले आहेत. अनेक जण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत, तर कमेंट्समधून तिने पुन्हा चित्रपटांमध्ये काम करावं अशी विनंतीही करत आहेत.

अनेक नेटकऱ्यांना अनुष्का शर्माचा लूक आधीपेक्षा खूप बदललेला वाटत आहे. असं म्हटलं आहे. तर काहींनी ती आधीपेक्षाही सुंदर दिसत आहे असंही म्हटलं आहे. त्यामुळे तिच्या नव्या लूकची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

अनुष्काचा शेवटचा चित्रपट ‘झिरो’ हा २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्याबरोबर शाहरुख खान आणि कतरिना कैफ हे कलाकारही होते. यानंतर तिने Chakda ‘Xpress या चित्रपटात काम केलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles