होर्मुझ सामुद्रधुनीमधून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या व्यापाराला अडथळे निर्माण होत असल्याने अनेक देशांत इंधन पुरवठ्याची साखळी विस्कळीत होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधन बचतीचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या ‘काटकसरीच्या’ आवाहनानंतर आता देशभरात अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं दिसून आहे. पंतप्रधान मोदी यांनी देखील स्वत:च्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्याने कमी केली आहे. त्यानंतर अनेक मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्र सरकारने देखील अंमलबजावणी करत मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाईकवरून विधानभवनात दाखल झाले आहेत.https://x.com/yadujavalkar/status/2054806269119406579?s=20


