अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा) पदाधिकारी जाहीर
*मुंबई, – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
जाहीर झालेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे –
– जिल्हाप्रमुख : राजेंद्र दळवी (नगर तालुका व नगर शहर, पारनेर विधानसभा, कर्जत-जामखेड विधानसभा, राहुरी विधानसभा – ४० गावे वगळून)
– सहसंपर्कप्रमुख : दादाभाऊ येणारे (पारनेर विधानसभा), चंद्रकांत चिकणे (राहुरी विधानसभा), संजय भांबुरे (शेवगाव विधानसभा)
– विधानसभाप्रमुख : अजिंक्य लव्हाट (शेवगाव विधानसभा)
– तालुकाप्रमुख : अविनाश मगरे (शेवगाव तालुका), विजय शेंडे (श्रीगोंदा तालुका), नितीन कोतकर (नगर तालुका)
– प्रभारी तालुकाप्रमुख : मयूर डोके (जामखेड तालुका)
– तालुका संघटक : किसन सुपेकर (पारनेर तालुका)
– तालुका समन्वयक : उदय गांगर्डे (शेवगाव तालुका)
– शहर समन्वयक : प्रवीण दुबे (शेवगाव शहर)
नितीन भाऊसाहेब कोतकर यांची नगर तालुकाप्रमुखपदी नियुक्ती
नगर : शिवसेनेचे कट्टर व निष्ठावंत समर्थक हिंदुधर्मरक्षक स्व. अनिल भैय्या राठोड यांचे कट्टर समर्थक स्व. भाऊसाहेब कोतकर यांचे चिरंजीव श्री. नितीन भाऊसाहेब कोतकर यांची शिवसेनेच्या नगर तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख मा. आदित्यसाहेब ठाकरे, शिवसेना नेते खा. संजय राऊत, संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, शिवसेनेचे मा. संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर तसेच जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.
स्व. भाऊसाहेब कोतकर यांनी शिवसेनेशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहत पक्षाची विचारधारा आणि संघटन मजबूत करण्यासाठी कार्य केले. त्यांच्या निष्ठेचा आणि कार्याचा वारसा पुढे घेऊन जाणारे नितीन कोतकर यांची नगर तालुकाप्रमुखपदी झालेली नियुक्ती ही कोतकर कुटुंबाच्या शिवसेनेशी असलेल्या जुन्या नात्याची पावती मानली जात आहे.
नितीन कोतकर हे मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य अविनाश कोतकर यांचे बंधू असून सामाजिक व विकासात्मक कार्यातही ते सक्रिय आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे नगर तालुक्यात शिवसेना संघटनेला अधिक बळकटी मिळणार असून तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्रित करून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी ते प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
स्व. अनिल भैय्या राठोड आणि स्व. भाऊसाहेब कोतकर यांच्या विचारांचा व निष्ठेचा वारसा जपत शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करणार, असा निर्धार नवनियुक्त नगर तालुकाप्रमुख नितीन भाऊसाहेब कोतकर यांनी व्यक्त केला.
नितीन कोतकर यांच्या नियुक्तीबद्दल शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत


