भोंदूबाबा खरातची लंका ढासळणार? ईडीच्या छाप्यात पुराव्यांचा ढिगारा; कार्यालय सील!

महिला लैंगिक शोषण प्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या आलिशान बंगल्याची मध्यंतरी झाडाझडती घेतल्यानंतर, शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्याच्या कॅनडा कॉर्नर भागातील ‘ओकस प्रॉपर्टीज’ कार्यालयात सहा ते सात तास पडताळणी केली. येथून मालमत्तेशी संबंधित अनेक महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले. या कारवाईबद्दल पथकाने कुठलीही माहिती देण्यास नकार दिला.
​भोंदूबाबा खरातचे आर्थिक व्यवहार आणि कोट्यवधींच्या मालमत्तेची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी प्रगतीपथावर आहे. महिला लैंगिक शोषण प्रकरणी अटक झाल्यानंतर त्याची डोळे दीपवणारी संपत्ती समोर आली होती. महिला लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने मालमत्तेशी संबंधित दस्तावेज, बँक खात्यांचे तपशील आणि अन्य आर्थिक बाबींची माहिती पूर्वीच सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) दिली आहे. त्या अंतर्गत ईडीने खरातच्या घर, कार्यालय व इतर मालमत्तांवर छापे टाकून छाननी सुरू केली.
गेल्या सोमवारी ईडीच्या पथकाने कर्मयोगीनगर येथील खरातच्या ‘तृप्तबाला’ बंगल्यावर छापा टाकून दिवसभर छाननी केली होती. खरातने भोंदूगिरीतून मोठी माया जमवली. अनेक देशांमध्ये भ्रमंती केली. देशांतर्गत तो अनेकदा खासगी विमानाने प्रवास करीत होता
इतकेच नव्हे तर, खरातने भक्तांकडून त्यांच्यासह कुटुंबीयांचे आधार कार्ड, छायाचित्र व अन्य कागदपत्रे घेतली होती. याचा वापर त्यांना अंधारात ठेवून अहिल्यानगर येथील पतसंस्थांमध्ये खाती उघडण्यासाठी केल्याचे समोर आले. या सर्व खात्यांचे वारसदार अर्थात ‘नॉमिनी’ म्हणून त्याने स्वतःचे नाव ठेवले होते. पतसंस्थेतील या खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार झाले. या सर्वांची ईडीकडून छाननी केली जात आहे. खरात व कुटुंबीयांच्या नावे नाशिक शहरासह सिन्नर, अहिल्यानगरमधील शिर्डी, राहता, निघोज, निमगाव कोऱ्हाळे आदी ठिकाणी शेकडो कोटींचे भूखंड आणि शेतजमिनी आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles