चिचोंडी पाटील सेवा सोसायटीच्या व्हा.चेअरमनपदी बबनराव बाळाजी कोकाटे यांची बिनविरोध निवड..
चिचोंडी पाटील सेवा सोसायटीचे मा.व्हा.चेअरमन काशिनाथ वाडेकर यांनी राजीनामा दिल्यामुळे सेवा सोसायटीच्या रिक्त असलेल्या व्हा.चेअरमनपदी श्री.बबनराव बाळाजी कोकाटे यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडीबद्दल त्यांचा सन्मान मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे,मार्केट कमिटीचे मा.सभापती बाबासाहेब गुंजाळ,सरपंच शरद पवार,शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे सर, मा.सरपंच मच्छिंद्र खडके,शिवसेना नेते डॉ.ययाती फिसके,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे,मा.सरपंच राजुशेठ हजारे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना मा.सभापती प्रविण कोकाटे,शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे सर,मा.सरपंच मच्छिंद्र खडके आदींनी यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत नूतन पदाधिकाऱ्यांना संस्थेचे हित जोपासण्याचे आवाहन केले.
यावेळी चेअरमन संदीप कोकाटे,मा.सरपंच पांडुरंग कोकाटे,मा.चेअरमन महादेव खडके,विठ्ठलदेवा कोकाटे,मा.सरपंच दिलीप पवार,मा.व्हा.चेअरमन डॉ.मारुती ससे,उपसरपंच विश्वासागर कोकाटे,मा.व्हा.चेअरमन काशिनाथ वाडेकर,लोकमान्य पतसंस्था चेअरमन सुरेश ठोंबरे,मा.व्हा. चेअरमन काशीनाथ बेल्हेकर,अर्जुन वाडेकर,संचालक पंडितराव कोकाटे,अंबादास फिसके,चंद्रकांत सदाफूले,कासमशेठ सय्यद,महेश जगताप पा.,ग्रा.पं.सदस्य प्रशांत कांबळे,संदीप काळे,ज्ञानेश्वर ठोंबरे,दत्तू धुळे,पै.राजु कोकाटे,भाऊसाहेब वाडेकर,वैभव कोकाटे,ह.भ.प.बाबासाहेब परकाळे,विलासराव दवणे,राघू कोकाटे,राघू कोकाटे,गणेश वाडेकर,नानासाहेब कोकाटे,अनिल चव्हाण,मोहन कोकाटे,मंगेश कोकाटे,सचिव दत्ता झांबरे,शेषराव ठोंबरे,संतोष कोकाटे,प्रशांत लबडे,आदींसह सभासद व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
चेअरमन संदीप कोकाटे व मा.व्हा.चेअरमन डॉ.मारुती ससे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


