२०२९ ला जय पवार दादांचे वारसदार? बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार

बारामती मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार या रिंगणात असल्या, तरी भविष्यात या मतदारसंघाची धुरा कोणाकडे असेल, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. २०२९ च्या निवडणुकीत जय पवार हे उमेदवार असतील का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. आज (गुरूवारी, ता २३) सुनेत्रा पवार यांच्यासोबत मतदानासाठी आले असताना जय पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना २०२९ च्या उमेदवारीबाबत विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना जय पवार म्हणाले, “२०२९ मध्ये मी उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे,मला कार्यकर्ता म्हणून काम करायचं असल्याचं ते म्हणालेत”.

लोकांची मागणी असली तरी स्वतःच्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देताना त्यांनी नमूद केले की, “माझी इच्छा किंवा माझ्या मनात काय आहे, तर मला पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणूनच माझे काम पुढे चालू ठेवायचे आहे आणि सर्वांना मदत करायची आहे”. माझी तयारी आहे की नाही यापेक्षा लोकांची ही इच्छा असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.पुढच्या काळात, म्हणजेच २०२९ मध्ये जय पवार यांना निवडणुकीमध्ये मैदानात उतरवले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर विचारले असता जय पवार म्हणाले, “२०२९ मध्ये मी उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, माझ्या मनात काय आहे, तर मला पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम सुरू ठेवायचे आहे आणि सर्वांना मदत करायची आहे”. माझी इच्छा काय आहे यापेक्षा लोकांची ही मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles