सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांचे मोठं वक्तव्य….

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. त्यांचं निधन हा फक्त राष्ट्रवादी, पवार कुटुंबियच नाही तर महाराष्ट्रावर झालेला मोठा आघात आहे. आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

दादा जाऊन अजून 48 तास, 72 तासही उलटलेले नाहीत, तरी त्यांच्या पदाबाबत चर्चा सुरु आहे, याकडे तु्म्ही कसं पाहता, घाई होतेय का?. यावर शरद पवार म्हणाले की, ‘त्या विषयाची आम्ही चर्चाच करत नाही. ही चर्चा मी मुंबईत पाहतोय’. “प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवलेलं दिसतय. यावर मी अधिक भाष्य करणार नाही” असं शरद पवार म्हणाले.

सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांच्याबरोबर माझी त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ज्या चर्चा मी ऐकतोय, त्या मुंबईत सुरू आहेत, मी येथे (बारामतीत) आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. आता प्राधान्याने काय करावं? हे त्यांनी ठरवलेलं दिसत आहे. त्यांच्या आधी-मधी मी भाष्य करणार नाही”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles