बारामती राहुरी पोटनिवडणुकीत चमत्कार? थक्क करणारा एक्झिट पोल समोर!

चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. आता या सर्वच राज्यांतील मतदानाची प्रक्रिया संपलेली आहे. या राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमासोबतच बारामती आणि राहुरी या महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या पोटनिवडणुकीच्या एक्झिट पोलचे आकडे आता समोर आले आहेत.

एक्झिट पोलच्या अंदाजनुसार बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठ्या प्रमाणात मतं पडणार आहेत. पोल पंडितच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार बारामतीत सुनेत्रा पवार यांना 92 ते 97 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. त्यांना एक ते दोन लाख मतं मिळू शकतात. तर दुसरीकडे राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांनादेखील 95 हजार ते 1 लाख मतं मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार बारामतीच्या मतदारांनी सुनेत्रा पवार यांना भरभरून मतदान केल्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांना तब्बल 97 टक्के मतं मिळणार असतील तर हा एका प्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. त्यामुळे प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी नेमके काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधाऱ्याचे प्रयत्न चालू होते. सुरुवातीला काँग्रेसने या मतदारसंघासाठी आपला उमेदवार दिला होता. परंतु नंतर सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला. त्यानंतर राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी सुनेत्रा पवार यांना मतदान करा, असे आवाहन केल्यानंतर त्यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे. असे असताना आता एक्झिट पोलचे आकडेदेखील त्यांना विक्रमी मतदान होणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांना नेमकी मतं किती मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles