Wednesday, March 4, 2026

वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकला

अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या मोठ्या भावाची लहान भावाने कुऱ्हाडीने डोक्यात करत गळा आवळून हत्या केलीय. परमेश्वर राम तायडे अस मयताच नाव आहे. जालन्यातील सोमठाणा परिसरात ही घटना घडली असून या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. मयताची पत्नी आणि लहान भावाचे अनैतिक प्रेम संबंध होते. वहिनीसोबतच्या अनैतिक प्रेमसंबंधात सख्ख्या भाऊ अडथळा ठरत असल्याने लहान भावाने वहिनीच्या मदतीने कुऱ्हाडीने डोक्यात वार करत गळा आवळून मोठ्या भावाची हत्या केलीय. हत्येनंतर मृतदेह गोणीत भरून दगड बांधून तलावात फेकून दिल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी मयताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुण बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मयताचा भाऊ ज्ञानेश्वर राम तायडे आणि मयताची पत्नी मनिषा परमेश्वर तायडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याने भावजयीच्या मदतीने भावाने भावावर कुऱ्हाडीने वार करून खून केला त्यानंतर त्याचा मृतदेह गोणीत भरला त्यात दगड टाकून तो मृतदेह दुचाकीवर नेऊन तलावातील पाण्यात फेकण्यात आला. ही घटना बदनापूर तालुक्यातील वाला सोमठाणा तलावात उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.

अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने भावाने भावाचा खून केल्यानंतर मृतदेह सोमठाणा तलावात फेकून दिला.12 नोव्हेंबर रोजी एका पोत्यात एक मृतदेह पाण्याबाहेर आला. यावेळी पोलिसांनी आणि नागरिकांनी हा मृतदेह पाण्याबाहेर काढला .चौकशी केली असता मृतदेहाची ओळख पटली होती. याप्रकरणी मयताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली आणि भावाने भावजयीच्या मदतीने खून केल्याचं पुढं आलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles